Lyrics
आ आ आ आ आ
प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई
तूच माउली तूच साउली सावरे विठाई
विठाई सावरे विठाई
नक्षत्रांचे दीप लोपले
विश्वकमल है पहा उमलले
चराचरावर अंधाराची चराचरावर अंधाराची होते ही अस्ताई
तूच माउली तूच साउली सावरे विठाई
विठाई सावरे विठाई
एकतारि ही हाती घेउन
तुझेच करिते मंगल चिंतन
एकतारि ही हाती घेउन
तुझेच करिते मंगल चिंतन
वाहियले हे जीवन माझे वाहियले हे जीवन माझे प्रभु तुझ्या पायी
तूच माउली तूच साउली सावरे विठाई
विठाई सावरे विठाई
पुंडलिकाची पाहुनी भक्ती
उभा तूच या वीटेवरती
दासि जनी तुज शरण येतसे दासि जनी तुज शरण येतसे जळ तिला घेई
तूच माउली तूच साउली सावरे विठाई
विठाई सावरे विठाई
प्रभातकाळी तुझे ईश्वरा नाम मुखी येई
GOVIND POWLE, MADHUKAR JOSHI
Royalty Network