Lyrics
रामचंद्र मनमोहन, रामचंद्र मनमोहन
नेत्र भरुन पाहिन काय नेत्र भरुन पाहिन काय
रामचंद्र मनमोहन
सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास
सुधाधवल विमल हास आ आ आ
सुधाधवल विमल हास अनुभवास येईल काय
अनुभवास येईल काय रामचंद्र मनमोहन
आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे
मम मानस-राजहंस
मम मानस-राजहंस पुनरपि मज देशिल काय
पुनरपि मज देशिल काय रामचंद्र मनमोहन
जाउ तरी कोणास शरण आ आ आ
जाउ तरी कोणास शरण, करील कोण दु:ख हरण
मजवरि होऊन करुण प्रभुचं चरण दावील काय
प्रभुचं चरण दावील काय रामचंद्र मनमोहन
अशनि राम, पाणि राम, वदनि राम, नयनी राम
ध्यानी-मनी एक राम ध्यानी-मनी एक राम वृत्ती राम जाणिल काय
वृत्ती राम जाणिल काय रामचंद्र मनमोहन
नेत्र भरुन पाहिन काय नेत्र भरुन पाहिन काय
रामचंद्र मनमोहन
J K Upadhye, V D Ambhaikar
Royalty Network