Lyrics
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
सौंदर्याची दौलत टाकून
सौंदर्याची दौलत टाकून जासी भलत्या घरा
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
राजमंदिरी असंख्य नारी
रूपवती त्या अतुल सुंदरी
रूपवती त्या अतुल सुंदरी
तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा
उलटी सारी तर्हा तुझी रे उलटी सारी तर्हा
शोभे का हे तुला माधवा
आ आ आ आ
शोभे का हे तुला माधवा
गालबोट हे तुझिया नावा
सोडून दे ती कुब्जा काळी
सोडून दे ती कुब्जा काळी सोडून दे श्रीधरा
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
हात जोडिते पदर पसरिते
तुजविण जीवन उदास गमते
हात जोडिते पदर पसरिते
तुजविण जीवन उदास गमते
तुझ्या पदाविण दिसे भुकेला
तुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
तुझी रे उलटी सारी तर्हा
G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE
Royalty Network